Subscribe

RSS Feed (xml)

Powered By

Skin Design:
Free Blogger Skins

Powered by Blogger

अरुणोदय....

देशातलं शहरी-ग्रामीण जीवन उभं करणारं,विशेषतः ग्रामीण महाराष्ट्राचं वास्तव दर्शन घडवणारं एक सदर. काचेच्या महालात राहून, रापलेल्या, उन्हात हिंडणार्‍या माणसांची दुःखं, वास्तव मांडणं वेगळं आणि प्रत्यक्षात ग्रामीण जीवनाशी समरस होऊन माणसांची उभी केलेली चित्रणं  वेगळी. ‘अरुणोदय’ चा लेखक हा त्याच्या मातीत घडलेल्या, त्यानं अनुभवलेल्या कथांच, कवितेचं, नाटकांच आपल्यासमोर प्रकटीकरण करतो आहे.
ग्रामीण भागात वावरणारा बेरकी, विनोदी, हजरजबाबी, रागीट तितकाच फणसासारखा मऊ, दिलेला शब्द पाळण्यासाठी स्वतःला गहाण ठेवणारा, मातीशी इमान राखणारा असा माणूस ‘अरुणोदय’ मध्ये वाचयला मिळेल आणि हेच ‘अरुणोदयचं’वैशिष्ठ्य आहे.या सदरातील लेखन हे लेखकांचा उत्सफुर्द कलाविष्कार असून त्यांच्या लेखनाशी किंवा मताशी प्रकाशक सहमत असेलच असं नाही.